
‘राखेमुळं माझी सहा एकर द्राक्षबाग कामातून गेली’; गावकऱ्यांच्या संघर्षानंतर वीज निर्मिती प्रकल्प तात्पुरता बंद
सांगलीमधील चार गावांनी एकत्र येऊन लढा देत भूमी ग्रीन एनर्जी कंपनीचा ‘वेस्ट-टू-एनर्जी’ स्वरूपाचा प्रकल्प बंद पाडण्यात यश मिळवलं आहे.
“राखेमुळं माझी सहा एकर द्राक्षबाग कामातून गेली. पानावर पडणारं प्लॅस्टिक खरडून सुद्धा निघंना, अशी ती राख होती. दिवसभर पांढरा आणि रात्री काळा धूर या...